Sunday, August 11, 2019

पावसा आता तरी तुला आवरायला हवं


पावसा आता तरी तुला आवरायला हवं,
खुप झाला आता तरी तुला सावरायला हवं.
नेहमीच वाटत तू आमच्या सांगण्या प्रमाणेच तू बरसायला हवं,
पण आता आमच्याच अस्तित्वासाठी पावसा आता तरी तुला आवरायला हवं.
  
माहीत आहे आम्हाला नाही तू क्रूर अनं नाही तू निष्ठुर,
आमच्याच कर्मांना बोलतो आम्ही नियतीचा महापूर.
आमच्या साठी नव्हे तर त्या मुक्या जनावरांसाठी तरी तुला सर्व काही विसरायला हवं,
खुप झालं पावसा आता तरी तुला आवरायला हवं,

जात,धर्म,पंत विसरून पुन्हा एकदा घडले माणुसकीचे दर्शन,
स्वार्थाचे आणि सत्तेचे झेंडे मिरवू पहाणार्‍यांना पुन्हा एकदा आले शहाणंपण.

नेहमी प्रमाणेच लोकांनी त्या निर्जीव दगडाच्या घेतल्या गळा, शपथा आणि आन,
आणि पुन्हा एकदा देवासारखा धावून आला तो फक्त खाकी वर्दीतला च जवान.

नको आम्हा ती सरकारी मदत, ना नको कोणा मदतीचा हात,    
पुन्हा एकदा हवी ‘ पावसा ‘ फक्त तुझ्या मायेची साथ.

सरते शेवटी एवढच सांगणं...
कोल्हापूरची माउली आणि पंढरीच्या विठूराया आता तरी तुला धावायला हवं,
खुप झालं पावसा आता तरी तुला आवरायला हवं.मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा