Wednesday, March 23, 2011

कॉलेज कट्टा ............



कॉलेज कट्टा हा शब्ध सर्वांच्या परिचयाचा असेलच , अर्थातच कॉलेज च्या मुलांच्याच. हा कट्टा कॉलेज ची एका प्रकारे शान च वाढवतो हा सर्वांना हवा हवा सा वाटतो.मंग ते एखादे टपरीचे दुकान असणे गरजेचे नाही.कारण काही टवाळ पोरांनी ह्या कट्ट्या ची इज्जत घालवलेली आहे. तो कट्टा कोठे हि असू शकतो,जसे कि कॉलेज च्या बॉयस कॉमन अथवा गर्ल्स कॉमन रूम समोर असो. कॅन्टीन समोर,ऑफिस शेजारी ,क्लास रूम बाहेरील बेन्च अथवा पायऱ्या,कॉलेज बाहेर अथवा कॉलेज बाहेरील बस स्टोप असो,जिते फक्त आपलीच हुशारी चालते अशी कोणती हि जागा.


ह्या कट्ट्या चा इतिहास काही सा जुनाच म्हणावा, कारण ह्याने अनेक आठवणी जपून ठेवल्या आहेत.अनेक युद्धे जिंकताना व हारताना पाहिली आहेत अर्थातच ती प्रेमाचीच असणार.मग lecture bunk करून ह्या ठिकाणी (कट्ट्या वर )तासन तास बसायचे समोर फूट बोल खेळणारी मुले बघत कोणत्यातरी मित्राची उगाच च खेचाय ची.......... आणि समोरून येणाऱ्या मुलीला बघून ती च्या खुबसुरतीवर, नखर्यावर तारीफ करायची अथवा टीका ? किंवा गाणी गात बसायचे असा वेळ कधी निघून जातो हे समजत देखील नाही. पण त्यात काही वेगळीच मजा हि मजा क्लास रूम मध्ये बसून घेणे जवळ जवळ अवघडच.पण त्यात पण काही पंडित मंडळी अशी असतात कि तेथे सुद्धा पुस्तके उघडून बसलेली असतात किंवा एखादा सम सोल करत बसतात काय म्हणाव ह्या माणसांना हि माणस नाही पुस्तकी किडेच म्हणणे योग्य होयील.


म्हणून प्रत्येक कॉलेज मध्ये एक तरी कट्टा असणे आवश्यक्य आहे कारण हा कट्टा म्हणजे कॉलेज ची जाणंच होय व तो जर नसला तर कॉलेज मध्ये काही तरी मिसिंग असल्याचा भास होतो च होतो

1 comment:

  1. खूप छान लिहिले आहेस.
    लेबल मध्ये कॉलेज कट्टा पण टाक. ब्लॉग हेडिंग मध्ये अवतरणचिन्ह " वापरू नकोस.

    ReplyDelete

मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा