एक वर्ष जाऊन लोटलं
तरी सुद्धा पुन्हा एकदा येताना नवीन काहीच
नाही वाटलं.
नेहमी प्रमाणेच त्याच डीजे आणि डॉल्बीच्या
आवाजात मात्र
ढोल, ताशा आणि टाळ, मृदुंगांचा नाद कुठे
तरी हरवतोय.
तरी सुध्दा पुन्हा एकदा मी तुमच्या साठीच
येतोय…
मला नेहमीच बसायच होत माझ्या आई(पार्वती)
आणि वडीलांच्या(शंकर) मांडीवर,
आणि मनसोक्त खेळायचं होत त्या कैलास पर्वतावर,
पण नेहमीच तुम्ही तुमच्या हट्टा पायी,
कधी बसवलतं कृष्णाच्या शेषावर
तर कधी बसवलतं
विष्णुच्या गरूडावर.
आता माहित नाही यंदा तरी मी कशावरून जातोय,
पण मी नेहमी प्रमाणेच माझ्या मूषका वरून
च येतोय.
आणि पुन्हा एकदा मी तुमच्या साठीच येतोय…
भक्त माझा मात्र मला लालबागचा राजा
आणि चिंचपोखळीचा चिंतामणी मध्येच बघतोय,
आणि जगाला माझ्या
अष्टविनायकांचा विसरमात्र पडतोय.
काय माहित, आता
तरी तुम्हाला तुमच्यातल्या माझ्या अस्तित्वाचा भास तरी होतेय,
तोच करून देण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्या
साठीच येतोय…
माझ्याच आगमनासाठी पुन्हा एकदा वेळ आणि
पैसा पाण्यासारखा खर्च होतोय,
तर कुठे त्याच पैशाच्या
अभावी पुरात नाहक बळी मात्र जातोय.
कोणाच ठाऊक ह्या पैशाचा सदुपयोग मात्र कधी
होतोय,
हेच सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्या
साठीच येतोय…
नेहमी प्रमाणेच तुमच्याच कर्मांमुळे विनाश
मात्र माझ्या निसर्गाचाच होतोय,
तरी सुद्धा तुमच्याच दु:खाचे पाढे मी पुन्हा-पुन्हा
ऐकतोय.
म्हणून पुन्हा एकदा मी तुमच्या साठीच
येतोय…
👍👍👌👌👌
ReplyDeleteमनकल्लोळ वर कमेंट दिल्या बद्दल धन्यवाद.आपली ओळख जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडले असते.
ReplyDeleteआतुरता तुमच्या आगमनाची च
ReplyDeleteInformation in Marathinice information sir
ReplyDelete