मी श्रीकांत वळंजू आणखीन काय सांगणार तुम्हाला माझ्या बद्दल. माझ्या मनात असंख्य विचारांचा गलबला, गोंधळ माजला होता. हा कल्लोळ,गलबला आणि गोंधळ कोणाला सांगायचा, कुठे व्यक्त करायचा,असे अनेक प्रश्न मला भेडसावत होते तसा माझा स्वभाव शांत म्हणायला हरकत नाही शांत म्हणजे मला जास्त बडबड करायला आवडत नाही , म्हणजे या चा अर्थ असा नाही कि, जे बडबड करतात त्यांना माझा विरोध आहे. पण माझा स्वभावच असा आहे पण मना मध्ये मात्र असंख्य विचारांचा गोंगाट आणि आवाज.
हा ब्लोग लिहिण्या चे कारण म्हणजे असच मित्रांचे ,माझ्या दादा चे व इतरांचे ब्लोग वाचता वाचता एक वाचनाची आवड निर्माण जाली त्यातूनच हा ब्लोग लिहिण्याची कल्पना मला सुचली .पण आता एक प्रश्न होता तो ब्लोग ला नाव काय ठेवायचे,भरपूर विचार केला नाव पण भरपूर लोकांनी सुचवली पण अर्ध्या पेक्षा तर जास्त नाव तर बुकच होती उरलेली मला आवडत नव्हती.त्यातून च एक नाव सुचले "मनकल्लोळ"नशिबाने हे तरी नाव माझ्या साठी उपलब्ब्ध होते, आणि लगेच ते बुक करू ठेवले. तसा मी ह्या ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये नवीनच त्यामुळे ह्याचे नियम व याबद्दल मला एवढी माहिती नाही, तरी पण मंग माझ्या दादा ची व मित्रांची मदत घेऊन हि एक छोटीशी केलेली सुरवात .
तेव्हा माझे विचार आणि मला आणखीन जवळून जाणून घ्यायचे असल्यास माझा ब्लोग वाचा आणि हो तुम्हाला काय वाटले ते सांगण्या साठी 'कमेंट' द्यायला विसरू नका.
Congrats,
ReplyDeleteफायनली तू पण ब्लॉग चालू केलास. फक्त व्याकरणाच्या चुका कडे लक्ष दे.
त्या निमित्ताने माझे मराठी व्याक्रण तरी सुधारेल आणि ब्लोग लिहिण्यास मदत केल्या बद्दल धन्यवाद.
ReplyDelete