काळा घोडा फेस्टिव्हल या बद्दल भरपूर ऐकले होते . पण प्रत्यक्षात जाण्याची संधी कधी आली नाही, त्या दिवशी असच दादा ने विषय काढला कि काळा घोडा फेस्टिव्हल लागले आहे जाऊन बघून ये आणि दुसऱ्या दिवशी पेपरात वाचले कि काळा घोडा फेस्टिव्हल ५ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत आहे.तेव्हा विचार केला कि वेळ पण आहे तेव्हा जाऊन बघून येऊ .मध्ये दोन रविवार भेटत होते एक सहा तारखेचा आणि मंग तेरा तारखेचा शेवटचा रविवार भेटत होता.म्हणून कॉलेज च्या मित्रांना विचारले की जाऊया का फेस्टिव्हलला आपले तेवढेच मनोरंजन पण होईल आणि नवीन काही तरी शिकायला पण भेटेल पण प्रत्येकाचे काही ना काही प्रोब्लेम होतेच. कोणाला बाहेर जायचे होते तर कोणाला आपला रविवार घरी बसून आराम करण्यात घालवायच होता . मी जर ह्यांना जबरदस्ती करत बसलो तर फेस्टिव्हल संपायचे आणि मी आलेली संधी ह्या "चू" लोकांनमुळे गामाऊन बसायचो .तेव्हा विचार केला कि ६ तारखेला च जाऊया. म्हणजे फेस्टिव्हल पण फिरून होयील आणि "अनिल नाईक" ह्यांचे जहागीर चे प्रदर्शन पण बघून होयील आणि ती त्याची लास्ट तारीख होती.
मग काय निघालो तुम्हाला तर माहिती आहे. ट्रेन मध्ये प्रवास करणे आणि ते पण रविवारी म्हणजे युद्धभूमीत उतरण्या सारखेच फरक फक्त इतकाच कि आपण युद्धभूमीत समोरच्या शत्रूला मारून पुढे आपले स्थान मिळवतो येथे फक्त त्यांना ट्रेन मध्ये(प्रवाशांना ) ढकलून आपले स्थान मिळवायचे आणि मग बाहेर आल्यावर जस काही आपण ऐकाध्या मसाज सेंटर मधून मसाज केल्याच अनुभव येतो ते तर प्रत्येक मुंबई कराच्या नशिबी च लिहिले आहे आणि मग ऐकदाचा विटी ला उतरलो. मला खात्रीनिशी पत्ता माहिती नव्हता, पण जहागीर आर्ट ग्यालरी माहिती होती. तेव्हा चालत चालत निघालो आणि पोहचलो ऐकदाचा .मी तर फक्त एण्ट्री गेट पाहून विचारात पडलो मला तर समजेनाच हे काय आहे नक्की. मग आधी प्रदर्शन बघून घेतले कारण ग्यालरी फक्त सहा वाजेपर्यंत चालू असते आणि आधीच ४ वाजून गेले होते . चित्र तर ऐका पेक्षा ऐक सरस होती. अनिल नाईकानी तर ब्लायकेन व्हाईट फोटो जसे असतात तसे त्यांनी पेंटिंग काढली होती, ते खरेच सुंन्दर होते. त्यांचे "चारखोलचे " काम तर अप्रतिमच होते मला खरी उत्सुकता होती बाहेर असणाऱ्या वेड्या जालेल्या कला प्रेमींची कला बघण्याची आणि लगेच पेंटिंग बघून बाहेर आलो.
मी एण्ट्री गेट पाहुन च समजलो कि आता काय काय दिसणार आहे कारण तो गेट च ऐक संदेश देत होता त्याला चक्क हेल -मेट लावले होते आणि मुंबई डब्बे वाल्यांचे डब्बे तसेच "ग्लोबलवारमींग" आणि "सेव द अर्थ" अशा पोस्टर ने तो गेट सजवला होता आणि मुंबई चे जीवन आणि जीवनाचे महत्वव्यक्त केले होते . काय कल्पना आहे ना ? फुढे तर ऐका यीथे तर खरी गम्मत आहे .आत शिरताच मोठा टेबल ठेवला होता व त्या वर कागद लावला होता . प्रत्येक जन त्या वर एक मेसेज लिहित होते .कोण आपली हस्ताक्षर करत होते मी हि लिहिले " सेव द ट्री सेव द लाईफ " ह्या वेळ ची थीम होती "जग" म्हणून कि काय आतमध्ये बामबूच्या काट्याना पृथ्वीचा आकार देऊन त्या मध्ये कचरा आणि प्लास्टिक टाकून प्रदूषणाची ऐक आठवण करून दिली होती. आणि पुढे मेटल ची माणसे बनऊन व त्या ऐका छोट्या टोपली मध्ये कांदे ठेऊन माहागाई वर टीका केली होती . मेटल, खीळे ,चईन आणि ईतर लोखंडी टाकाऊ वस्तून ची सांगड घालून काळा घोडा बनवला होता .तो त्या फेस्टिव्हल चा केंद्र बिंदूच वाटत होता .तसेच सुतळीचा वापर करून कल्प- वृक्ष तयार केले होते आणि त्यांना सालायींच्या बॉटल लावल्या होत्या , बुटांच्या प्रतिमा , गायीचा पुतळा व त्या वर वेगवेगळी चित्रे ,असे तेथे सर्व मांडले होते हे सर्व विचारांच्या पलीकडले होते.
कित्येक कलाकार आपली कला दाखवत होते कोण ती चित्र काढून तर, गाऊन, नृत्य करून ,बोलून , वस्तूबनऊन आणि कोण कोण त्या मार्गाने हे सांगणे कठीणच ? मला पण वाटत होते आपण पण काही कराव पण वेळ कमी होता आणि भरपूर फिरायचे बाकी होते.लोकंतर कॅमेरा घेऊन ते क्षण आपल्या कॅमेरात बंदिस्थ करण्याचा असफल प्रयत्न करत होते पण थोडे च ते सर्व कॅमेरात बंदिस्थ होणार होते मुळीच नाही. तो असफल प्रयत्न मी हि माझ्या मोबाईल च्या कॅमेरातून केला पण ते संपतच नव्हते. ह्या फेस्टिव्हल ने सर्व कलाकारांना एक संधी दिली होती व त्या चा ते पुरे पूर वापर करत असताना भारतीयांना नव्हेच तर परदेशीय लोकांना देखील दाखवत होते. भारतीय कला जगाच्या कानाकोपऱ्यातर नेत होते, हो परदेशी पर्यटक हि भरपूर होते .काळा घोडा चा डान्स, गाणी ,थिएटर आणि फिल्म बरोबर च यंदाच स्ट्रीट शो हा फेस्टिव्हल ची जाण होता बाहुल्यांची मोठी मिरवणूक याच बरोबर बबल परेढ हि होती . ह्या सर्व गोष्टी आपण टीव्ही वर पहिल्या होत्या पण आज प्रत्यक्षात पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .जणू काही तिथे हे सर्व कला प्रेमी आपली कला वेड्या सारखी इतरांना दाखवत होते व सर्व जन ते मंत्रमुग्ध होऊन बघत होते. न बोलता आपली कल्पना कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशी पोहोचवायची ते ह्यांच्या कडून शिकावे. हे सारे मी तुम्हाला शब्धात सांगू शकत नाही त्या साठी तुम्हाला तेथे जाऊन ते सर्व अनुभवायलाच हवं ..........................
छान,
ReplyDeleteकाही फोटो का नाही लावले?
thanks
ReplyDelete