सध्या एप्रिल चालू आहे.हा महिना म्हणजे लग्नाचा कारण ह्या महिन्या मध्ये बरीचशी लग्न असतात आणि लग्ना चे मुहुर्थ पण ह्याच महिन्यात जास्त असतात.लग्न म्हणजे एक सोहळा.मुला आणि मुलीच्या जीवनातील एक अविस्मरणीय गोष्ट,दोन जीवांचे मधुर मिलन.सनई चौघद्यांच्या स्वरात आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने नवीन जीवनात केलेले पदार्पण होय. सुख स्वप्नाच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर आणि माहेरच्या नात्याची
मंगळसूत्रात केलेली गुंफण.हा सोहळा म्हणजे एका प्रकारे नवीण नाती जोडण्याचे एक साधन.
पण ह्या आता सर्व बोलण्याच्या गोष्टी झाल्या, ह्या ओळी आपणास फक्त लग्न पत्रिकांनवर वर पाहायला मिळतात. ह्या फक्त पुस्तकी गोष्ट होऊन राहिल्या आहेत. आताच्या ह्या कलियुगात लग्नाची परिभाषाच बदली आहे.हा सोहळा एक फॅशन बनला आहे.आणि पैसा खर्च करण्याची एका प्रकारची वेगळी पद्धत, खरच आताच्या ह्या काळात लग्नावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो खास लग्नासाठी साठी वेगळ्या अशा संस्था आहेत. त्या ह्या सर्व गोष्टी सांभाळतात म्हणजे लग्नाला लागणाऱ्या सर्व गोष्टी मग हारा फुला पासून ते वराती पर्यंत सर्व गोष्टी ते सांभाळतात ह्या साठी खास कंपन्या आहेत ते ह्या सर्व गोष्टी पाहतात.पण त्या साठी त्यांना हवी ती किमंत द्यावी लागते पण ह्या झाल्या मोठ्या लोकांच्या गोष्टी म्हणजे खास करून हि पद्धत मोठ्या लग्नासाठी असते म्हणजे एका द्या मंत्र्याच्या पोराचे लग्न असेल किंवा एकाधी मोठी व्यक्ती असेल तर, हे आपल्या सारख्या सामान्य लोकांचे चोचले नाहीत.
पण तरी हि आपल्या सारखी सामान्य लोक पण लग्नावर पैसा खर्च करायला मागे पुढे बघत नाही.त्या साठी खास लोन किंवा कर्ज काढती पण लग्न मात्र थाटामाटात करतील मग ते आपल्या बजेट मध्ये बसो अथवा न बसो आणि त्या मध्ये जर मुलीकडची बाजु असेल तर मंग काय मरणच त्या मुलीच्या बापाचे.हुंडा हा प्रकार तर तुम्हाला माहिती असेलच. पण तो आता काही प्रमाणात कमी झाला आहे पण अजुन पण काही लोक मुलगी विकत घेतल्या सारखा हुंडा मागतात म्हणूनच कि काय सध्याची तरुण मंडळी पळुन जाण्याचा मार्ग स्वीकारतात.
लग्न म्हटलं कि मानपान आणि पाहुणचार आलाच जर घरात पहिलेच लग्न असेल तर मग काय देने भागच नाही तर मंग हि मंडळी आपल्या कोणत्याहि कार्यात सहभागी होत नाहीत आणि जर झाली तर मंग कोणत्या ना कोणत्या कारणाने विघ्न आणायला पण मागे पुढे बघत नाहीत, हे सर्व मलापण माहिती म्हणजे मी मुळचा कोकणाचा आणि हे सर्व प्रकार आमच्या येथे सरास घडतात.मग त्यासाठी अगधी लान्हा थोर पासून म्हणजे छोट्यांन पासून ते अगधी मोठ्यान पर्यंत सर्वांना काही ना काही भेट द्यावी लागतेच आणि आता तर म्हणजे प्रत्येक शुभ-कार्याला म्हणजे लग्नाला दारू हा प्रकार दिल्या शिवाय लग्नाला मजाच नाही.हळदीला तर अमृत वाटल्या सारखी दारू वाटली जाते कारण त्या शिवाय नाचायला मुड येत नाही ना. मग त्या घरातील लोकांना चालत असो अथवा नसो ह्यांना मात्र दारू हवी लोक तर लग्न कधी आहे हे विचारत नाही तर हळद कधी आहे हे आधी विचारतात आणि प्रत्येकाच्या आवडी निवडी पण वेगळ्या कोणाला देशी हवी तर कोणाला इंग्लिश तर कोणाला काय,ह्या वर तर लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात कारण त्या शिवाय लग्नाला शोभा येत नाही असे लोकांना वाटते.
लग्ना च्या आधी सर्व गोष्टी अगधी नीट ठरवलेल्या असतात प्रत्येकाला आपापली काम अगधी ठरवून दिली असतात आणि प्रत्येकाने ती पार पाडण्यासाठी अगधी मोठ्या मनाने माना देखील हलवतात पण लग्नाला मात्र काय वेगळेच घडते. प्रत्येक जन आपापल्या नादात असतात. आपण लग्नात उठुन दिसावं ह्या साठी त्यांची धडपड चालु असते. मग नवरामुली कडे कोणाचे लक्ष नसते फक्त कोणी किती तोळे दागिने घातले आहेत हे बघण्या साठी लोकांच्या नजरा पुर्ण मंडपात फिरत असतात आणि तरुण मुल आपली सेटिंग लावण्या साठी एकाधी सुंदर मुलगी शोधत फिरत असता.लोक तर फक्त नवरा मुलीच्या डोक्या वर अक्षता पडण्याची वाट बघत असतात, अक्षता पडताच सर्व जेवायला असे काय पाळतातकी जणु काही कित्येक वर्ष जेवलेच नसावे आणि आपल्याला सर्वांच्या पहिले जेवण भेटावे यासाठी ईतरांचे ड्रेस खराब करत जेवण घेण्यासाठी धडपडत असतात. पण मात्र नवरा मुलीगी जेवले की नाही ह्याच्याशी कोणाला काही हि घेणे देणे नसते. असा हा सोहळा मजा मस्ती करत पार पडतो.
आताच्या ह्या युगात लोकांनी लग्नाची परिभाषाच बदलली आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीला विसरून आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत चाललो आहोत.त्यामुळे आपल्या संस्कृतीला जपणे हि प्रत्येकाची जवाबदारी आहे आणि प्रत्येकाने आपल्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आनंदात पार पाडावा.
सुंदर श्रीकांत, एकदम सुंदर लिहिले आहेस. खूप छान वाटले तुझे लिखाण आणि लिखाणाची शैली बघून.
ReplyDeletegood keep it up !!!