Saturday, May 14, 2011

श्वास

                                                               राहिले रे अजून श्वास किती
                                                               जीवना,ही तुझी मिजास किती
                                                               आजची रात्र खिन्न ताऱ्यांची
                                                               आजचा चंद्रही उदास किती ?
                                                               मी कसे शब्द थोपवू माझे?
                                                               हिंडती सूर आसपास किती
                                                               दुःख माझे.. विरंगुळा त्यांचा
                                                               मी करावे खुळे कयास किती?
                                                               ओळखीचे कुणीतरी गेले..
                                                               ओळखीचा इथे सुवास किती
                                                               हे कसे प्रेम? या कशा आशा?
                                                               मी जपावे अजून भास किती?
                                                               सोबतीला जरी तुझी छाया..
                                                               मी करू पांगळा प्रवास किती

हि कविता माझी नसून सुरेश भट यांची आहे.पण हि कविता वाचताना एकदम एक जाणीव झाली आणि मनात विचार आला कि ह्या श्वासाचे किती महत्व आहे आपल्या जीवना तेच मी येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

श्वास ह्या शब्दातच सार जीवनाच रहस्य दडलेले असते कारण जो पर्यंत श्वास आहे तो पर्यंत माणसाला किमंत आहे.ऐकदा तो निघून गेला कि मनुष्याची किमंत शून्य.ह्या श्वासाची किमंत माणसाला मेल्या नंतर च समजते.

जन्म आणि मृत्यू या मध्ये फक्त एका श्वासाचे अंतर असते. तो जर चुकून जरी थांबला तर विचार करा काय परीस्तीथी होते.ऐवढेच नाही तर तो जर कायमचा च थांबला तर आपलेच आप्तेष्ट आणि नातलग आपल्याला मेलेले घोषित करतात आणि आपल्याच मरणानंतर आपल्याला आपल्या नावाने हाक न मारता "डेड बॉडी" म्हणून संबोधतात.ह्या श्वासाची किमंत माणसाला तेव्हा समजते जेव्हा तो निघून गेला कि तोच देह आपल्या च माणसांना नकोसा होतो ते क्षणभर हि आपल्याला घरात ठेवू इच्छित नाही आणि मग आपल्या नाका ,तोंडात आणि कानात कापसाचे गोळे टाकले जातात का तर जंतू बाहेर येऊ नये म्हणून आणि काय तर जिवंतपणी आपण ब्रॅन्डेड परफ्युम वापरणारे आणि सुगंधी अत्तर लावल्या शिवाय बाहेर न पडणारे शेवटी अखेरच्या प्रवासात आपल्याला मात्र दहा वीस रुपयाला मिळणाऱ्या निलगिरी चे पाणी मारून बाहेर काढले जाते आणि ऐवढेच नाही तर सर्वात जास्त किमतीचे रंगीबेरंगी कपडे वापरणारे आपण, आपल्यालाच मग नंतर पन्नास रूपयाच्या पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले असते आणि रोज झोपायला असणार्‍या अलिशान बेड ऐवजी बांबूच्या काट्यांची गादी असते.आणि आपलीच माणस आपल्याच माणसाला आपल्याला हात लाऊ देत नाही का तर हात लावल्या मुळे त्या देहातून पाणी येण्याची शक्यता असते म्हणून अगदी अलगद पणे त्या देहाला हाताळले जाते कारण ऐकदा श्वास निघून गेला कि आपल्या आतमधल्या सर्व क्रिया थांबतात व त्या मुळे देहा मध्ये हवा जाऊन तो फुगू लागतो आणि काही वेळाने त्या मध्ये पाणी साचू लागते म्हणून त्याला तिरडी किंवा मृत्यू शय्ये वर झोपवताना दोरी ने बांधले जाते.त्यामुळेच कि काय सर्व जन त्या देहाला उचलण्याची घाई करत असतात. मग हि च माणस कोणा साठी थांबत नाही मंग मुलगा,मुलगी,पती किंवा आई असो कोणत्या हि नातलगाची वाट बघत नाहीत. त्यांना फक्त घाई असते ती म्हणजे त्या देहाची विलेवाट लावायची त्याचे कारण पण तसेच असते. कारण त्या देहातून प्रचंड वास व रोगजंतूचे संक्रमण होत असते. तरी आता बरीच विज्ञानाने प्रगती केल्यामुळे आपण तो देह जास्त कालावधी पर्यंत ठेवू शकतो पण अजून देखिला खेड्या पाड्यात अशा सुविधांचा अभाव आहे. आणि तस पण गावची माणस प्रेत किंवा देह जाळल्या शिवाय जेवत नाहीत अशा पद्धती प्रचलित आहेत.

आता शेवटी मात्र जाताना कमवलेली सारी संपत्ती,धन मागे ठेवावे लागते आणि जर अंगावर काही दागिने असतीलच तर ते पण स्मशानात काढले जातात आणि एक पद्धत म्हणून छोटासा सोन्याच तुकडा माफ करा तुकडा म्हणने पण जास्त होयील एक सोन्याचा कण दिला जातो आणि सर्व वस्तू अगधी न विसरताच नव्हे तर अगधी विचारून काढल्या जातात आणि असतो तो फक्त देह आणि त्यावर गुंडाळलेला पांढरा फडका आणि काही हार आणि फुले.आणि मग त्या देहाला लाकडांवर ठेवून अग्नी दिला जातो आणि मग तो देह पुर्ण पणे जळण्याची वाट बघितली जाते.ऐकदा अग्नी लागला कि मंग कोणीहि आपल्या मधला किंवा आपला माणूस गेला म्हणून धावत किंवा रडत जात नाही त्या जवळ. जो पर्यंत अग्नी लागत नाही तो पर्यंत च सर्व जन हात पाय आपटून रडत असतात. ज्या क्षणी अग्नी लागला तेथेच सर्व संपले.आणि मंग त्याच ठिकाणी लगेच कार्याची तारीख म्हणजे दुखवटा दिवसाची तारीख ठरवली जाते.

ह्याच दिवशी सर्वांचे खरे चेहरे समोर येतात अगदी नातवंडान पासून ते अगदी पोटच्या मुलानं पर्यंत. जर मरणार्‍या व्यक्तीने मरणापूर्वी च जर आपल्या संपत्तीची वाटणी केली असेल तर बरे नाही तर त्याच संपत्ती वरून पुढे भावा बहिणीन मध्ये भांडणे होतात.गळ्यात गळे घालून रडणारे भाऊ नंतर संपत्तीसाठी एकमेकांचा गळा दाबायला पण मागे पुढे बघत नाहीत.यात होते काय तर ज्यांना स्वताचा हिस्सा भेटतो ते कुश आणि ज्यांना नाही भेटत ते मेलेल्या माणसाच्या नावणे आयुष्य भर खडी फोडत रडत बसतात आणि मंग तो फक्त दुखवटा दिवस म्हणून नावाला राहतो.

अशी हि माणसाची कथा, म्हणून जो पर्यंत श्वास आहे तो पर्यंत तुमचा येथे निवास आहे.




4 comments:

  1. सुंदर श्रीकांत, मला वाटलेच होते तुझी ह्या विषयावर नक्कीच एक पोस्ट येईल. ह्या प्रसंगात तू आयुष्यातले खूप कडवट अनुभव घेतले आहेस.

    ReplyDelete
  2. सुंदर लेख आहे . छान लिहीलयस मित्रा

    ReplyDelete
    Replies
    1. मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. कमेंटदिल्या बद्दल धन्यवाद.

      Delete

मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा