कवी कालिदास |
आषाढस्य प्रथम दिवसे मेघम्आश्लिष्ट सानुं |
वप्रक्रीडापरिणतगज प्रेक्षणीयं ददर्श ||
कालिदासाच्या उत्तमात उत्तम काव्यातील मेघदूत हा कोहिनूर हिरा आहे. पण कालिदासाच्या शाकुंतला या अमर प्रभावी नाटकाने कालिदासाची कीर्ति जगभर केली आहे. कालिदासाचा जन्म इसवीसन पूर्वी पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात मध्य प्रदेशातील उज्जैन नगरीत झाला. तो तत्कालीन वैभवशाली राजाच्या पदरी होता. गेल्या दोन हजार वर्षाच्या काळात अनेक राजे महाराजे आले आणि गेले, पण कालिदासाचे नाव कायम आहे. आज ही कविकालीदासांचा सुभाषितांत कोणीही हात धरू शकत नाही. प्रत्येक सुभाषितांत त्यांनी मानवी परिस्थितीचे अगधी सोप्या अन सरळ भाषेत वर्णन केले आहे.
- अतिस्नेह: पापशंकी |
अत्यंत प्रिय व्यक्ती जर नेहमीच्या वेळी आली नाही, फार उशिरा झाला तर नाना शंका येऊ लागतात.कुठे अपघात तर झाला नसेल ? असा याचा अर्थ आहे.
- परदु:ख शीतलम् |
दुसऱ्याचे दु:ख मोठे वाटत नाही. पण तेचं दु;ख स्वत:च्या वाट्याला आले तर आकांत होतो.
- मरणं प्रकृती: शरिरिणाम् |
मरण शरीराची प्रकृती आहे.जो आला तो जाणारच आहे, पण तरी ही सभोवताली मृत्यू दिसू लागलाकी कुणालाही ही गोष्ट मान्यच नसते.
अशी अनेक उदाहरणे देता येतील पण अजून काही कालीदासंबद्दल सांगायचे आहे. पुढील माहिती देताना मी नीलकंठ खाडीलकर यांच्या लेखाची मदत घेतली आहे.
स्त्रीचे जीवन कसे आहे ?कालिदासाच्या साहित्यातून आपली संस्कृती निर्माण झाली. त्यांनी आपल्या एका साहित्यात स्त्रियांबद्दल असे लिहून ठेवले आहे.ते म्हणतात “कन्या लहानपणी मातापित्याची सेवा करते तरुणपणी पतीची व सासुसासर्याची सेवा करते. शेवटच्या टप्प्यावर तिची स्वता:ची मुले लहानाची मोठी करते.”
एकही शब्द वायफळ न वापरता केलेल्या स्त्रीच्या जीवनाचे हे चित्रण आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की दोन हजार वर्षापूर्वी केलेले हे चित्रण आजतागायत असेच आहे. ह्या मध्ये काडी मात्र बद्दल झाला नाही.ही च कालीदासांची थोरवी आहे.
कालिदासंबद्दल अनेक दंथकथा प्रसिद्ध आहेत. त्यातील “मुखकमलातून उगविली दोन नेत्रकमळे” ही दंतकथा भरपूर प्रसिद्ध आहे.
मुखकमलातून उगविली दोन नेत्रकमळे
एकदा कालिदास एका लावण्यवती स्त्रीसमवेत शृंगार करीत असता ती कालिदासाला म्हणाली, राजदूताने समस्यापूर्तीची दवंडी पिटवली आहे. “कमळातून कमळे उद्य पावतात असे ऐकिवात आहे, पण पाहिले नाही.”
कालिदासाने लगेचच समस्यापूर्ती केली. तो म्हणाला, सखे तुझ्या या मुखकमलातून दोन नेत्रकमळे उगवलेली आहेत ना ?
या समस्यापूर्तीबद्दल मोठे बक्षीस लावले होते. तिने बक्षीस मिळविले. पण राजाने विचारले की कालिदासच अशी समस्यापूर्ती करू शकतो. होय ना ? तिने कबुली दिली . तेव्हा राजाने कालिदासाला बोलावून घेतले व त्याला तितकेच बक्षीस दिले !
त्याने शाकुंतला, मालविका-अग्निमित्र आणि विक्रम–उर्वशी अशी जी तीन नाटके लिहिली आहे त्यात स्त्रीसौंदर्याचे मनमुराद वर्णन केले आहे. कालिदासाच्या शब्दातच वाचा त्याची लावण्यवती स्त्री कशी आहे.
तन्वी श्यामा शिखरिदशना पक्व बिंबाधरोष्टी |
मध्ये क्षामा चकितहरिणी प्रेक्षणा निम्ननाभी:||
श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां |
या तत्र स्यात् युवतिविषये सृष्टिराद्येव धातु :||
अर्थ – सडपातळ बांध्याची , ज्वानीचा बहर आलेली, अणकुचीदार दांत, पिकलेल्या तोंडल्या प्रमाणे ओठ, बारीक कमर, भरलेले वक्षस्थळ, घाबरलेल्या हरणासारखे डोळे शोभणारी, खोल बेंबी, स्तनांच्या भारामुळे किंचित वाकलेली, ब्रह्मदेवाने मन लावून निर्माण केलेल्या प्रथम कलेसारखी.
हरिणांना भरविणारी कालिदासाची शकुंतला |
रम्याणि वीक्ष्य मधुरां च निशम्य शब्दान्|
पर्युत्सुकी भवति यत्सुखिनोऽपि जन्तु:||
महाकावी कालिदासाच्या विक्रम -उर्वशीय नाटकातील एक दृश्य |
महाकवी कालिदास, तुझ्याच साहित्याच्या वाचनाने व ‘शाकुंतल’ च्या मनोमन दर्शनाने अब्जावधी लोकांना हुरहुर वाटत आली आहे . म्हणूनच म्हणतात की, रामायण लिहिलेले वाल्मिकी, महाभारत सांगितलेले महर्षी व्यास आणि ‘शाकुंतल’ नाटक लिहिलेले कविकुलगुरू कालिदास या तिघांखेरीज अन्य सर्व साहित्य नष्ट झाले तरी भारतीय संस्कृतीची आणि भारतीय उत्तुंग विचारांची फारशी हानी होणार नाही !!!
सुंदर माहिती श्रीकांत.
ReplyDeleteThis is the very very best information for me.
ReplyDeleteMrs Veena Patil
विना पाटील आपले मनकल्लोळ वर स्वागत आहे आणि कमेंट दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteमनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद. आपली खरी ओळक जाणून घेण्यासाठी आम्हाल नक्कीच आवडले.
Deleteआज आषाढ़ महिन्याचा पहिला दिवस। साहित्य क्षेत्रात कवी कालिदास दिन म्हणून हा दिवस ओळखला जातो। यानिमित्ताने प्रस्तूतचा अत्यंत वाचनीय व माहितीपूर्ण असा आहे। लेखकास धन्यवाद।
ReplyDelete- रामनाथ चौलकर