वर्षासहलीना जायचं तर धबधब्यांना पर्याय नाही. मात्र, अशा सहलींना जाताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.त्या ठिकाणी काय धोके असतात व त्यांन पासून कोणती खबरदारी घ्यायची याची माहिती दिली आहे ज्येष्ठ गिर्यारोहक राम काटदरे. त्याचा हा मी घेतलेला आढावा.
त्यांनी दिलेल्या काही महत्वाच्या टिप्स आणि काही खबरदारी चे उपाय मी येथे देत आहे.
धबधब्याच्या प्रवाहात उतरताना पाण्याचा जोर किती आहे, हे जाणून घ्या. प्रवाहाला खूप जोर असल्यास वाहून जाण्याची शक्यता असते. पांडवकडा, चिंचोटी ह्या ठीकाणी धबधब्यात प्रवासी वाहून गेलेल्याच्या बातम्या मिळाल्या आहेत.
धबधब्याच्या डोहाचा, त्यात असलेल्या दगडांचा अंदाज घेणे गरजेचे आहे. कारण अशा ठिकाणी दगडांमध्ये कपारी असतात व त्यात अडकून जीव जाण्याचा धोका असतो. चिंचोटी, कोंडेश्वर या ठिकाणी अशा कपारी आहेत.
शेवाळ आणि बुळबुळीत दगडावरून घसरून पाण्यात पडण्याचा धोका असतो.
अनेकदा पाण्यात हात-पाय आपटून दुखापत होऊ शकते आणि पाण्यात बुडण्याची शक्यता असते.
धबधब्यात पाण्याचा रंग बदलून पाणी गढूळ होऊ लागले, पाण्याबरोबर बारीकबारीक दगडगोटे वाहून येऊ लागले, तर हा पाण्यातून बाहेर पडण्याचा इशारा आहे हे लक्षात घ्या.
जिथे आपण बसलो आहोत, तिथे पाऊस नसला तरी धबधब्याच्या वरच्या भागात मोठा पाऊस होत असल्यास अचानक पाण्याचा लोंढ येण्याचा संभव असतो.
पाणी वाढून एखाद्या ठिकाणी अडकून पडल्यास पाणी उतरेपर्यंत सुरक्षित जागी थांबा. जास्त वेळ वाट पहावी लागली तरी चालेल पण जीव तरी वाचेल. उगाचच नसते धाडस करू नका.
कड्याच्या टोकावर उभे असताना वाऱ्यामुळे तोल जाऊ शकतो पडण्याची शक्यता असते.
अनेकदा धुक्यामुळे आपण कड्याच्या टोकावर असल्यास किंवा बाजूलाच खोल दरी असल्याचा अंदाज येत नाही. माळशेज घाटात असा अनुभव अनेकदा पर्यटकांना येतो. अशा वेळी दु:साहस जीवावर बेतू शकते.
भुसभुशीत मातीचा अंदाज न आल्यामुळे घसरण्याच्या घटना घडल्या आहेत.
नाला, ओढा पार करताना एकमेकांचा हात धरून, साखळी करून तो पार करावा. त्यासाठी स्थानिकांकडून त्या ठिकाणाची योग्यती माहिती घ्यावी.
ग्रुपमधील सगळ्यांनी एकाच वेळी पाण्यामध्ये उतरू नये. कोणी तरी एकाने काठावरती थांबणे गरजेचे आहे.
ग्रुपमध्ये कमीत कमी एकाला तरी पोहण्याचे थोडे फार ज्ञान असणे गरजेचे आहे.
शक्यतो अशा ठिकाणी कॅमेरा ,दागिने आदी किमती वस्तू नेऊ नये.
आपल्याप्रमाणे अनेक ग्रुपही सहलीसाठी येतात आपल्या आरडाओरडा, मोठ्याने गाणी लावणं, हावभाव आदी वर्तनाचा इतरांना त्रास होणार नाही, हि काळजी घ्यावी.
अशा ठिकाणी कपड्यांच भान आवश्यक आहे. खास करून मुलींने याची खबर दारी घेणे आवश्यक आहे.
पांढरा, निळा, पिस्ता किंवा अशा लाइट शेड, पारदर्शक दिसणारे कपडे पाण्यात भिजताना घालू नका.त्याऐवजी डार्क शेडचे कपडे घाला.
खूप शॉर्ट किंवा टाइट फिटींगचे कपडे घालू नका.
एका दिवसाच्या पिकनिकला जायचंय, तर महागाचे कपडे कशाला ? असा विचार करत अनेक जणी स्वस्तातले कपडे घेतात पण असे करू नका असे कपडे फाटण्याची शक्यता असते.
साडी किंवा पंजाबी ड्रेस असे कपडे पावसात भिजताना मॅनेजकरता येत नाहीत. म्हणून ते टाळाच. पण, अगदी बिकिनी घालूनही भर रस्त्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
आपल्या वयानुसार आणि शरीराच्या आकारमानानुसार कपडे निवडा.
किरकोळ शेरेबाजी, कमेंट्सचे रुपांतर हाणामारीत झाल्याची उदाहरणे घडतात. वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी हे भान राखणं आवशक्य आहे.
या ठिकाणी चप्पल घालणे आवशक्य आहे. पायाला जखमा होण्याची अथवा घसरण्याची शक्यता असते.
सोबत प्रथमोउपचार साहित्य आणि प्रथमोउपचाराचे किमान ज्ञान असणे आवशक्य आहे.
माळशेज घाटावर अनेकदा गाड्या थांबवून रस्त्यावर नाचतानाची दृश्ये पाहायला मिळतात.वेड्या वाकड्या पार्किंग मुळे अनेकदा अपघात होतात व स्थानिकांनाहि त्रास भोगावा लागतो.
सर्वात महत्वाच म्हणजे निसर्गाचा आदर राखून वागणं आवशक्य आहे. आपल्या बरोबरच बिस्किट, चॉकलेटचे रॅपर आपल्यासोबत परत आणावेत.
अशा ठिकाणी काही अपघात झाल्यास पहिली मदत होते ती गावकऱ्यांची त्यामुळे गावकऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे.
आपण कुणाबरोबर आणि कुठे पिकनिकला जातोय, याची माहिती घरी देऊन ठेवा. शक्यतो सोबत असणाऱ्या सगळ्या मौत्रिणीचे आणि त्यांच्या घरच्यांचे टेलिफोन नंबरही घरी देऊन ठेवा.
जेथे पिकनिकला जाणार आहोत, तिथल्या पोलिस स्टेशनचा नंबरही घरी देऊन ठेवा.
कपड्यांचे एकदोन जोड सोबत घेऊन ठेवा.सोबत टॉवेल न्यायला विसरू नका.
पोहता येत असेल, तरच समुद्रात किंवा नदी मध्ये उतरावे.
वरील सर्व फोटो गुगलवरून घेण्यात आलेले आहेत.
No comments:
Post a Comment