Sunday, October 23, 2011

थायरॉइड बद्दल माहीत आहे तुम्हाला

थायरॉंइड म्हणजे काय ? 
थायरॉंइड या रोगा बद्दल जास्त जनजागृती नसल्यामुळे फार कमी लोकांना ह्या रोग बद्दल अचूक माहिती आहे. डाईबीटीस, कॅन्सर या सारख्या रोगान बद्दल जेवढी जनजागृती झाली आहे त्या तुलनेने ह्या रोगा ची फार कमी माहिती लोकांना आहे. त्या मुळे ह्या रोगाचे प्रमाण भारतात वाढले आहे.
थायरॉंइड म्हणजे नक्की आहे तरी काय ?
आपल्या शरीरात भरपूर एंडोक्राइन ग्लैंड्स (अंत: स्रावी ग्रंथि) असतात. ज्यानच काम असत हार्मोन्स तयार करण. त्या मध्ये थायरॉंइड हा एक आहे तो आपल्या मानेच्या मध्य भागी आढळतो. थायरॉंइड या मध्ये दोन प्रकारचे हार्मोन्स येतात T3 आणि T4 ,जे आपल्या शरीराचा मेटाबॉलिज्म नियंत्रित करतो. निरोगी माणसामध्ये ह्या हार्मोन्से प्रमाण नियंत्रित असते तर या उलट रोगी माणसामध्ये ह्याचे प्रमाण कमी किंवा जास्त होते यालाच थायरॉंइड डीसऑर्डर असे म्हणतात. थायरॉंइड हार्मोन्स ह्याचा परिणाम शरीरावर सर्वत्र म्हणजेच आपल्या हृदयावर, मेंदूवर आणि पचन क्रियेवर होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला थायरॉंइडची व्याधी होते तेव्हा आपल्या शरीरात असणाऱ्या हार्मोन्स नियंत्रित केल्या जाणाऱ्या पीयूषिका आणि थायरॉइड ग्रंथिन मध्ये अडथळे निर्माण होतात. 

थायरॉंइड डीसऑर्डर म्हणजे काय ? 
थायरॉंइड ग्रंथिन मधून निघणाऱ्या T3 आणि T4 हार्मोन्स चे प्रमाण कमी आणि जास्त होणे म्हणजेच थायरॉंइड डीसऑर्डर  होय. 

थायरॉंइड डीसऑर्डर चे प्रकार किती आहेत ? 
जागरूक थायरॉइड (हायपरथायरॉइडिझम) : 
रक्तात T3 आणि T4 प्रमाण अधिक असल्यास जागरूक थायरॉईड (हायपरथायरॉइडिझम) होतो. 

सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) : 
रक्तात T3 आणि T4 प्रमाण कमी असल्यास सुप्त थायरॉइड (हायपोथायरॉइडिझम) होतो. 

थायरॉंइड ची लक्षण कोणती आहेत ? 
शरीराचे कमी तापमान 
जलद किंवा संथगतीने चालणारी नाडी 
असामान्यपणे कमी किंवा उच्च रक्तदाब 
असामान्यपणे मोठी किंवा लहान मान किंवा मानेतील गाठ 
घोगरा, कर्णकटू आणि कठोर आवाज 
खूप तहान किंवा भूक        
आहार किंवा व्यायाम यामध्ये बदल केला नाही तरी लक्षात येण्याजोगा वजनातील बदल (वाढणे किंवा कमी  होणे) 
इतरांना थंडी वाजत असते तेव्हा गरम होणे किंवा इतरांना गरम होत असते तेव्हा थंडी वाजणे 
हृदयाचे ठोके 
विचित्र पद्धत किंवा लय 
बद्धकोष्ठता किंवा अतिसार
थकवा 
अशक्तपणा 
हायपोथायरॉइडिझमची काही लक्षणं :
आळस, थकवा, अंगदुखी, मंुग्या-पेटके येणं, सूज, केस गळणं, त्वचा जाड आणि कोरडी होण, औदासिन्य, बद्धकोष्ठ, आवाज घोगरा होण, नपंुसकत्व, मासिक सावात बदल, वंध्यत्व, गलगंड, चेहरा सुजणे, सांधेदुखी, मासिकपाळी संदर्भातील त्रास ( वेळेवर न येणे/जास्त रक्तस्त्राव होणे), प्रचंड झोप येणे, घट्ट शौच. 

हायपरथायरॉइडझमची काही लक्षणं : 
थकवा, भावनाशीलता, अस्वस्थपणा, थरथरणं, अशक्तपणा, छातीत धडधड, निदानाश, धाप लागणं, त्वचा गरम आणि ओलसर होण, वजन कमी होण, भुकेत बदल, मासिक स्त्रावात बदल, वारंवार गर्भपात, गलगंड, डोळे मोठे होणे, लाल होण, डोळ्यातून पाणी येण, थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढणे, खाज सुटणे,पुरुषांमध्ये स्तनांची वाढ,शौचास जास्त वेळा जावे लागणे. 

प्रत्येक वेळी सर्व लक्षणं असतीलच असं नाही. कोणतंही बाह्य लक्षण नसताना थायरॉइडचा विकार असू शकतो. नवजात अर्भकात आणि म्हातारपणी लक्षणांचा अनेकदा अभाव असतो. सर्व नवजात अर्भकात थारॉइडची चाचणी करणं अत्यावश्यक आहे. 

थायरॉंइड कॅन्सर म्हणजे काय ? 
थायरॉंइड कॅन्सरची सुरवात थायरॉंइड ग्रंथिन पासून होते. ह्या ग्रंथी तुमच्या मानेच्या खालच्या भागात असतात. थायरॉंइड कॅन्सर हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींन मध्ये आढळू शकतो. 

थायरॉंइडची सौम्य गाठ (Benign nodules) हि कॅन्सर मध्ये मोडत नाही. कारण सौम्य गाठी (Benign nodules) मधील सेल हे पूर्ण शरीरामध्ये पसरत नाहीत आणि ह्या गाठी पासून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा प्राणघातक धोका आढळत नाही. अनेकदा ९०% थायरॉंइडच्या गाठी ह्या सौम्य गाठ (Benign nodules) या प्रकारात मोडतात. 

थायरॉंइडची घातक गाठ (Malignant nodules) हि कॅन्सर मध्ये मोडते. हि बहुधा प्राणघातक हि ठरू शकते. ह्या कॅन्सर गाठीचे सेल आपल्या शरीरातील पेशींवर आणि विविध अंगावर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करतात. 

थायरॉंइड कॅन्सर चे किती प्रकार पडतात ? 
पॅपिलरी आणि फोलीकुय्लर थायरॉंइड कॅन्सर(Papillary and follicular thyroid cancers) : 
बहुधा थायरॉंइड मध्ये ९० ते ८०% कॅन्सर हा या प्रकारात मोडतो. या दोन्ही प्रकारातील कॅन्सर चे सेल हे सौम्य(Benign) असतात. अनेकदा पॅपिलरी आणि फोलीकुय्लर(Papillary and follicular thyroid cancers) याची वाढ हि हळू हळू होत असते. जर ह्याचे निदान लवकरात लवकर समजून आले तर ह्या वर योग्यतो उपचार करून तो नियंत्रणात आणला जाऊ शकतो. 

मेड्यूलरी थायरॉंइड कॅन्सर(Medullary thyroid cancer) : 
५ ते १० % कॅन्सर हा या प्रकारात मोडतो. ह्या कॅन्सर मध्ये शरीरातील ‘सी’ सेल चे प्रमाण वाढले जाते. जर हा शरीरामध्ये सर्वत्र पसरण्याच्या अगोदर त्याचे योग्य ते निदान करून, त्यावर योग्यतो औषध उपचार केला असता, हा कॅन्सर सहज रित्या नियंत्रणात आणला जाऊ शकतो. 

अनाप्लास्टिक थायरॉंइड कॅन्सर (Anaplastic thyroid cancer) :
थायरॉंइड कॅन्सर मध्ये हा प्रकार भरपूर कमी आढळतो (फक्त १ ते २%). ह्या प्रकारात आपल्या शरीरातील फोलीकुय्लर सेल वाढले जातात. ह्या प्रकारातील कॅन्सर चे सेल हे असामान्य असतात आणि त्यांचे निदान करणे खूप कठीण जाते. ह्या प्रकाराचा कॅन्सर हा नियंत्रित करणे खूप कठीण जाते कारण ह्या कॅन्सरच्या सेल ची वाढ आणि प्रसरण शरीरात भरपूर जलद गतीने होते. 

थायरॉंइड वर उपचार कोणते आहेत ? 
थायरॉंइड वर उपचार म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. सामान्यपणे या प्रकारात हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते. या आजारात कमी झालेल्या हार्मोन्सची कमतरता औषधांनी भरून निघू शकते. सुप्त थायरॉईड या प्रकारात गर्भवती महिलांना सामान्य महिलांप्रमाणे उपचार केले जातात. गरोदरपणात थायरॉइडचं प्रमाण वाढतं. जसजसे दिवस पूर्ण होत जातात तसतसा याचा डोस वाढवला जातो. गरोदर महिलांना योग्य ते उपचार वेळीच मिळावे, यासाठी गरोदर महिलांची प्रत्येक महिन्यात टी-4 आणि टीएसएच (Thyroid Stimulating Harmone) या दोन टेस्ट केल्या जातात. प्रसूतीनंतर सामन्यपणे औषधोपचार केले जातात. 

टीएसएच (Thyroid Stimulating Harmone) : 
थायरॉइड ग्रंथीमधून होणारा हार्मोन्सचा स्राव अधिक अथवा कमी प्रमाणात होतो आहे, हे समजण्यासाठी रक्ताद्वारा ही चाचणी केली जाते. जागरूक थायरॉईड (हायपरथायरॉइडिझम)मध्ये रक्तातील थायरॉइड हार्मोन्सचं प्रमाण अधिक असल्यास टीएसएचचं प्रमाण कमी असतं. तर सुप्त थायरॉईड (हायपोथायरॉइडिझम)मध्ये रक्तातील थायरॉइड हार्मोन्सचं प्रमाण कमी असतं आणि टीएसएच च  प्रमाण अधिक असतं. 

टेक्निशियन चाचणी(Radioactive iodine) : 
या प्रकारच्या टेस्टला थायरॉइड स्कॅन टेस्ट असंदेखील म्हटलं जातं. यात रेडिओ अ‍ॅक्टिव्ह आयोडिनची थोडीशी मात्रा रक्तात मिसळली जाते. त्यानंतर थायरॉइडचा एक्स-रे काढला जातो. ग्रंथीमधील आयोडिनचा स्तर वाढला असल्यास हायपरथायरॉइडिझम तर कमी असल्यास हायपोथायरॉइडिझम ओळखला जातो. महिला गर्भवती असल्यास ही टेस्ट केली जात नाही. 

एफएनएबी चाचणी (Fine Needle Aspiration Biopsy Of The Thyroid (FNAB) Procedure)
 गळ्यात गाठी आढळल्यास एफएनएबी ही चाचणी केली जाते. गाठीत सुई घालून त्यातील पेशी काढून घेतल्या जातात. या पेशींची मायक्रोस्कोपमध्ये तपासणी केल्यास थायरॉइडचं निदान केलं जातं. 















अँटिबॉडिज टेस्ट(Thyroid Antibodies) :
या टेस्टद्वारे थायरॉइडचं मूळ कारण शोधलं जातं. 

कोणामध्ये जास्त आढळतो ? 
थायरॉंइड हा जास्तकरून पुरुषांपेक्षा महिलांन मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. याचे प्रमाण पाच ते सहा पट जास्त पुरुषांपेक्षा महिलांन मध्ये अधिक असते. महिलांमध्ये असणा-या इस्ट्रोजन हार्मोन्समुळे हा विकार होतो. गर्भवती महिलांमध्ये आयोडिनच्या कमतरतेमुळे थायरॉइडची शक्यता वाढते. थायरॉइडची लक्षणं इतकी सामान्य असतात की ती लवकर कळून येत नाहीत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून याचा प्रतिबंध कसा करता येईल, याचा विचार करणं आवश्यक आहे. 

काय खावे ? 
मुख्यता थायरॉंइड रुग्ण व्यक्तीने हलका आहार घ्यावा. आणि आपल्या जेवणात हिरव्या पाले-भाज्यांचे प्रमाण वाढवावे. डाळ आणि पोळी चा सामावेश आहारात केव्हा ही चांगला. आणि कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचा जेवणात सामावेश करावा. 

काय न खावे ? 
वांगी, भात, दही, राजमा, ई. खाने टाळावे. थायरॉंइड व्यक्ती ने जास्त गरम किंवा जास्त थंड जेवण खाऊ नये. तेलात तळलेले आणि जास्त तिखट पदार्थ खाऊ नये. 

सूचना: 
वरील माहिती वेगवेगळे ब्लॉग, वर्तमानपत्र, पुस्तकातून आणि वेगवेगळया साईड वरून एकत्र करून वाचकांनसाठी संक्षिप्त रुपात मुद्देसुधपने लिहिली आहे. केवळ हि माहिती आपण एक सल्ला म्हणून घ्यावी आणि कृपया डॉक्टरांनच्या किंवा तज्ञांनच्या मदतीने थायरॉंइड वर योग्य तो उपचार करावा. 
वरील लेखा मध्ये काही लिहायचे राहिले असेल किंवा काही चूका असतील तर कृपया आपल्या कमेंट मधून सुचवाव्यात. 



















6 comments:

  1. Eating Seeds of pumpkin helps control thyroid disorder

    ReplyDelete
  2. SVP कमेंट दिल्या बद्दल धन्यवाद. मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे.
    मनकल्लोळ ला आपले पूर्ण नाव आणि ओळख जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कृपया आपली पूर्ण ओळख करून द्यावी.

    ReplyDelete
  3. Replies
    1. ब्लॉगमध्ये लिहिल्या प्रमाणे आपण या साठी तज्ञ डॉक्टरांची मदतघ्यावी.

      Delete
  4. I must admit that your post is really interesting. I have spent a lot of my spare time reading your content. Thank you a lot!

    foods to avoid with hyperthyroidism

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for comment and your valuable time spend on my blog for reading. I will try everyday to give new and interesting topic.

      Delete

मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा