Tuesday, December 6, 2011

कला आणि कलाकार

नेहमी मी माझ्या ब्लॉग वर पेंटिंग च टाकत आलो पण त्याबद्दल काही जास्त लिहिले गेले नाही. म्हणून आज विचार केला की जरा काहीतरी कलेबद्दल लिहूया आणि ब्लॉग वर टाकूया. खर म्हण्याला गेल तर कले बद्दल अस भरपूर काही लिहल जाऊ शकत, बोलल जाऊ शकत. तसा कलेचा इतिहास बघायला गेल तर भरपूर जुना आहे अगधी आदी मानवाच्या गुफा चित्रानं पासूनचा ते थेट आताच्या कोरपोरेट जगापर्यंत. घाबरू नका मी तुम्हाला आज कलेचा इतिहास नाही सांगणार आहे. कारण इतिहास म्हंटल की बऱ्याच जणांच्या कपाळाला आठ्या पडतात आणि खर सांगायचं म्हंटल तर मला पण तितकस कलेच्या इतिहासाच ज्ञान नाही आहे, की ज्याच्या आधारावर मी लिहू किंवा बोलू शकतो जाऊदे थोडस विषयांतर होतय असो. 
पण खरच का चित्रकार म्हणजे फक्त कॅनवास वर रेघा ओडून ब्रश ने कलर सोडणे इतपतच मर्यादित आहे का? मुळीच नाही कारण चित्रकाराने फक्त याच गोष्टीन पर्यंतच मर्यादित न राहता त्याचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असणे तितकेच गरजेचे असते मग तो चित्रकार असो शिल्पकार असो किंवा संगीतकार असो. कोणीही असा व्यक्ती की जो कलेचा भोक्ता आहे. आपल्या समाजामध्ये कलाकारांबद्दल किंवा त्यांच्या व्यक्तीमत्वा बद्दल एक वेगळीच समज किंवा ओळख आहे आणि ती माझ्या मते तरी फार चुकीची आहे 
कलाकार म्हणजे शांत स्वभावाचा, इतरांमध्ये कधीच न रमणारा, स्वताच्याच दुनियेत बेधुंद असणारा अशी काही धुसरशी प्रतिमा असते आणि कलाकार म्हटलं की त्याला व्यसन असणे गरजेचेच आहे कारण लोकांच्या मते हे क्षेत्रच असे असते. सतत उत्साहाने काम करण्यासाठी आणि कामातला जोश टिकवण्यासाठी एकच उपाय म्हणजे मद्यपान किंवा एकाध दुसरी सिगारेट हे प्रत्येकाच्या सवईवर अवलंबून असते. पण हि माझ्या मते तरी फार चुकीची समज आहे. मी असे देखील काही कलाकार पहिले आहेत की ते दोन दोन दिवस सतत दिवसरात्र काम करून सुद्धा साधे त्यांना चहाचे देखील व्यसन नाही मग मद्यपान आणि सिगारेट तर दुरचीच गोष्ट. असतील देखील असे काही कलाकार जे व्यसन करतात पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. त्यामुळे सर्वांवरच असा अविश्वास दाखवणे योग्य ठरणार नाही. 
काही लोक कलाकारांना त्यांची कला पाहून असे देखील म्हणतात की काय God gift आहे रे तुला, काय सुंदर चित्र काढतोस रे, खरच तुझ्या हातांन मध्ये जादू आहे. जर तोच संगीतकार असेल तर हेच वाक्य असे असेल. खरच तुझ्या मुखातून साक्षात सरस्वतीच गाते रे आणि जर डान्सर असला तर अजून काही तरी वेगळे असते. या मागे त्या व्यक्तीचा कलाकाराच्या भावना दुखावण्या चा हेतू मुळीच नसतो फक्त त्याच्या कलेची तारीफ करणे आणि कलाकाराला दिलेली हि प्रेमाची थाप असते. पण कधीकधी अशी कौतुकास्पद थाप देखील मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्याला अलगदशी टोचते आणि नकळतच आपण ह्या समाजापासून आणि ह्या समाजातील माणसांपासून वेगळे आहोत अशी भीतीदायक जाणीव कुठेतरी करून देते. यीथे मला कामत सरांचे एक वाक्य आठवते Artist is part of the society कलाकार हा एक समाजाचाच घटक आहे. तो इतरानपेक्षा वेगळा नसून देवाने सर्वांन प्रमाणे त्याला देखील समान बुद्धी आणि कौशल्य दीले आहे. ना कमी ना जास्त मग तो इतरांन पेक्षा वेगळा असूच शकत नाही. 
शेवटी काय तर कला म्हणजे एखाध्या गोष्टी बद्दल कुतूहल निर्माण होऊन जी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या हातातुन निर्माण होते तीच कला आणि तोच खरा कलाकार. 
कलाकार होण्यासाठी देवाची देणगी अथवा इतरांन पेक्षा वेगळे व्यक्तीमत्व असणे गरजचे नसते. खर सांगायचं झाल तर प्रत्येक गोष्टी बद्दल कुतूहल निर्माण होणे आणि नेहमी काही तरी नवीन शिकण्याची आवड असणे याच गोष्टी आवशक्य असतात. चित्रकार जेव्हा एखाद्या चित्रावर काम करतो तेव्हा ते चित्र चांगले दिसणे किंवा इतरांन पेक्षा वेगळे वाटणे हा कलाकाराचा उद्देश न राहता त्या चित्राचा अभ्यास आणि त्याचा इतिहास जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. समाजामध्ये काय चालू आहे. लोकांनमध्ये आपल्या कलेबद्दल किंवा आपल्या बद्दल काय भावना आहे हे जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे ठरते. थोडक्यात सांगायचं झाल तर कलाकार हा नेहमी बोलका असायला हवा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की फुकटची पोपटपंची. तर त्याने मी देखील इतरांन सारखाच एक समाजाचा घटक आहे हे जाणून समाजामध्येच राहून काम करणे तितकेच गरजेचे असते. कारण कलाकाराचा समाजाशी जितका अधिक सवांद चांगला, तितकाच त्याला लोकांना नक्की काय हवे आहे याची जाणीव होते व तो आपल्या कलेच्या माध्यमातून इतरांना व स्वताला आनंद देऊ शकतो. 
कोणीही व्यक्ती अथवा कलाकार हा काय आईच्या गर्भातूनच सर्व गोष्टी शिकून आलेला नसतो. तो जन्माला आल्यावर त्याच्या वर होणारे कलेचे संस्कार व त्यातूनच त्याच्या मध्ये निर्माण होणारी कलेची आवड आणि कुतूहलता या गोष्टी त्या व्यक्तीला भविष्यात एक उत्तम कलाकार म्हणून घडवू शकतात. पण हे कलेचे बाळ कडू त्याला लहान पणा पासूनच देणे, हे देखील तीतकेच गरजेचे आहे. माझ्या मते तरी प्रत्येक व्यक्ती मध्ये कुठे ना कुठे तरी कलाकार हा दडलेला असतो. पण काही लोकांना त्याची लवकर जाणीव होते तर काहीनां उशिरा तर काहीनां त्याची जाणीव करून द्यावी लागते. तेव्हा प्रत्येकाने हा आपल्या मधील दडलेला कलाकार शोधण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे मग तो कोणत्या हि रुपात असू शकतो कोणत्याही क्षेत्रात असू शकतो अथवा कोत्याही गोष्टीत असू शकतो फक्त शोधण्याची दृष्टी असणे गरजेचे असते आणि प्रत्येक गोष्टी बद्दल विचार करण्याची पद्धत म्हणा अथवा दृष्टीकोन म्हणा हा बदलणे देखिल गरजेचे आहे. मी तुम्हाला माझ्या पेंटिंग मधीलच उदाहरण देतो ना. जेव्हा मी नग्न (nude study) चित्र पाहतो, अभ्यास करतो, काढतो तेव्हा माझ्या घरातल्यांचा किंवा मित्रांचा त्या चित्रांकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा माझ्या पेक्षा वेगळा नक्कीच असू शकतो. माझा देखील दृष्टीकोन पहिला असाच होता पण जेव्हा माझे त्या गोष्टीतले वाचन वाढले त्यातील आभ्यास वाढला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याबदल ची असणारी माझी कुतूहलता आणि उत्सुकता ह्या सर्व गोष्टी माझा नग्न चित्रांन (nude painting) बद्दलचा बदललेल्या दृष्टीकोनास कारणीभूत ठरतील. असो हा विषय तसा भरपूर मोठा आहे ह्या विषयावर मी नक्की एक स्वतंत्र लेख लिहीन त्यामध्ये माझे नग्न चित्रांनचे (nude painting) स्वताचे अनुभव असतील. पण सांगायचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गोष्टी कडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलणे फार गरजेचे आहे. नुसता कलाकारांचाच नव्हे तर सामान्य व्यक्तीन चा देखील. तरच आपल्याला भविष्यात चांगले कलाकार आणि त्यांच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळेल. 



No comments:

Post a Comment

मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा