आजच महेंद्रच्या काय वाटेल ते.... ह्यांच्या ब्लॉग वर मैत्रिण हि पोस्ट वाचली आणि डोक्यात एक भन्नाट विषय सुचला आणि लगेचच लिहायला बसलो. माझ्या मनात अगधी शाळे पासूनच मैत्रिण आणि गर्लफ्रेंड या बद्दल भरपूर गोधळ होता. आता असा गैर समज करू नका की मी लहान पणा पासूनच मुलींन वर लाईन मारत फिरत होतो असं काही नाही. फक्क्त अनेक प्रश्न मनात घर करून बसले होते आणि अजूनहि आहेत. सुदैवाने शाळेमध्ये असताना नवी-दहावी तरी आमच्या वर्गातील मुलांचा वर्गातील मुलींशी अगधी छत्तीस चा आकडा होता. काय ठाऊक कशा वरून कदाचित आम्ही फार मस्तीखोर असू म्हणून . कारण मला आठवतय की शाळेत असताना आम्ही जवळ जवळ सर्वच मुलांच्या आणि मुलींच्या वडिलांचा उद्धार केला होता. वर्गात एखाद्या मुलाच किंवा मुलीच नाव आठवणार नाही, पण त्याच्या किंवा तिच्या वडिलांनच नाव मात्र लक्षात असे. समजतंय ना तुम्हाला मला काय म्हणाय च आहे ते असो... पण बाकीच्या वर्गात मात्र मुलमुली अगधी गुण्यागोविंदाने नांदायच्या अगधी पी.टी. च्या लेक्चरला जरी मैदानात सोडल तरी गार्डन मध्ये बसून गप्पा रंगत असत. त्यामुळे शाळे मध्ये तरी मैत्रिण हा प्रकार तेवढासा जाणवला नाही. पण तरी देखील मला पेंटिंग ची आवड असल्याने सर्व मुलींशी बोलणं मस्करी हा प्रकार व्हायचा. मला आठवतंय की मी इंटरमिजीएंट ला असताना एका मुलीला भरपूर लाईक करायचो. सुदैवाने ती आमच्या शाळेतली नव्हती. ती तेव्हा कॉलेज करत होती आणि तेव्हा मी शाळेत होतो फक्क्त परीक्षेला बसण्या पुरता ती दर रविवारी शाळेत इंटरमिजीएंट चे क्लास अटेंड करायची त्या नंतर आमची चांगली मैत्रि देखील झाली होती. आणि माझे मित्र देखील तिच्या नावाने माझी भरपूर खेचायचे पण नंतर परीक्षा झाली आणि हा चॅप्टर यथेच क्लोस झाला नंतर तीही कधी दिसली नाही आणि मी हि कधी तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही.
पण आता जरी मित्रांमध्ये असलो आणि तिचा विषय निघाला तरी एकदम चेहर फुलतो. मित्रांवर बाहेरून राग व्यक्त करतो पण मनातूण अगधी बर वाटत. पण मनात साला एक प्रश्न पडतो ते प्रेम होत की मैत्रि होती ??? नक्कीच मैत्रि तरी नसावी कारण माझ्या मनात तिच्या बद्दल ज्या भावना होत्या त्या मैत्रि पलीकडच्या होत्या. पण आता वाटत ते निव्वळ एका मुलींबद्दल वाटणार आकर्षण होत आणि ते असतच त्या वयात प्रत्येक मुलामध्ये. कारण तेव्हा कशाचीच अक्कल नसते ना कमवायची ना खायची. त्या नंतर काय मंग पुढे कॉलेज चा प्रवास. कॉलेज मध्ये तर प्रत्येक सुंदर मुलगी हि देवाने आपल्या साठीच बनवली आहे असं वाटू लागत आणि मंग प्रत्येक मुलीवर चातका सारखी नजर फिरू लागते. मंग लेक्चर असो, लॅब्ररी असो, कॅन्टीन असो फक्त मुलीच्या शोधात मन फिरत राहत. हि नाही तर ती आणि मंग मुद्दाम च फ्रेंडशिप डे च्या दिवशी तिच्याशी जाऊन मैत्रि करायची आणि वॅलेंटाईन-डे ची वाट पाहायची कारण हीच मैत्रिण उद्याची गर्ल-फ्रेंड होणार की नाही, हे त्याच दिवशी ठरणार असते. जर “ हा ” बोलली तर गर्ल-फ्रेंड नाही तर मैत्रिण किती साध सिम्पल गणित आहे ना ? हे म्हणजे एका तीरात दोन पक्षी मारण्यासारखा झाल.
पण ह्याला मैत्रि म्हणतात का प्रेम ? माझ्या मते तरी काहीच नाही. धड प्रेम हि नाही आणि मैत्रिण हि नाही हि फक्त तिच्याशी केलेली कमिटमेंट असते आणि आपला साधलेला हेतू. आधी निखळ मैत्रि करून फुढे जाऊन प्रेम करण्यात काय अर्थ आहे. मी कॉलेज मध्ये पण भरपूर जणांच्या तोंडातून ऐकल आहे की ‘अरे हि मुलगी मला फार आवडते रे. जरा फ्रेंडशिप करून देना, तु तिचा चांगला फ्रेंड आहेस ना ??’ ह्याला मी पण काही अपवाद नाही. नाही तर मंग आहेच की फेसबुक किंवा ऑरकुट तिची कुंडली शोधायला. पण आता तुमच्याच मनाला विचारून बघा हि खरच मैत्रि होती का ? आणि जरी ती आपली मैत्रिण झाली च तर आपण तिच्याशी तितके प्रामाणिक राहु का? जितके आपण आपल्या खऱ्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी राहतो, मुळीच नाही. कदाचीत ह्याच कारणांनमुळे एखदा मुलगा किंवा मुलगी सख्खे मित्रमैत्रिणी होऊ शकत नाही किंवा समाज म्हणून ती मैत्रि स्वीकारत नसावा. म्हणूनच कॉलेज मध्ये असणासरी एखादी सख्खी मैत्रिण सुधा बॉयफ्रेंड बरोबर जाताना अगधी बिनधास्थ जाईल. पण एखाध्या मित्रा बरोबर साध देवळात जाताना देखील थोडासा विचार करेल किंवा एखादा मित्र जर आपली जास्तच केअर करायला लागला असं कोणत्या मुलीला वाटू लागल की त्या मुलीची संशयाची सुई आपसूकच मान वर करू लागते आणि मंग ती सख्खी मैत्रिण पण ग्रुप मध्ये असूनसुद्धा आपल्याशी नसल्या सारखी वागते, आपल्यापासून हळूच दूर होते आणि कधी बोलायची बंद्द होते. हे देखील समजत नाही, असं का होत ???? आपण तिची इतरांन पेक्षा जास्त काळजी घेतकी म्हणून की आपणच कुठे त्या मैत्रि चा वेगळा अर्थ घेतला म्हाणून. हे ज्याच त्याने शोधाव, उत्तर तुमच तुम्हालाच मिळेल. त्या साठी एक सख्खी मैत्रिण असावी लागते, की जिच्यावर फक्त आपण एका मैत्रिणी प्रमाणेच प्रेम केल असावा आणि एक गर्लफ्रेंड की जिच्या वर फक्त आपण लाईफ पार्टनर म्हणूनच प्रेम केल असाव. तुम्ही एवढे हुशार असलाच की मला काय बोलायचं आहे हे तुम्हाला समजल असेलच. मी जरा स्पष्ट लिहत नाही कारण ब्लॉग आहे.नाही तर तुम्हाला माहिती आहेच की मुलांमध्ये असलो की आपण कोणत्या प्रकारच्या कमेंट मारतो मुलीना बघून आणि जर त्यातल्या त्यात कोणता मुलागा म्हणालाच की “ अरे बस.. रे किती बोलशील त्या मुली बद्दल ” असं म्हंटल की एकच उत्तर असत. तुझी गर्लफ्रेंड आहे, बहिण आहे नाही ना ?? मंग सोड ना आणि मैत्रिण आहे असं म्हटलं तर माझी सेटिंग लाव ना. अशी काहीशी उत्तर ऐकावी लागतात. आणि जर त्याला म्हटलं की “ अरे ती तुझ्या टाईप ची नाही ती माझी चांगली मैत्रिण आहे उगाचच पाठी लागू नको ”. “ हा मंग तु मांगे लागलेला दिसतोयस ” असं देखील ऐकवा लागतात म्हणजे इकडे आढ तिकडे विहीर, अशातील गत धड हा पण नाही म्हणू शकत आणि नाही पण नाही. कधी कधी असं देखील होत अगधी जवळच्याच मैत्रिणी च्या नावावरून उगाचच मित्र आपली खेचत बसतात आणि आपल्याला पण त्याची सवय होऊन जाते आणि उगाचच मनात तिच्या बद्दल काही हि भावना नसताना ते प्रेमाचे बिज जबरदस्तीने आपल्या मनावर बिंबवण्यात येते आणि आपण नकळतच आपल्याच सख्या मैत्रिणीच्या प्रेमात कधी पडतो हे देखील आपल्यालासुद्धा समजत नाही. शेवटी आपल मन आपल्या पेक्षा इतरांच जास्त ऐकत असत म्हणून कदाचित असं असाव. कॉलेज मध्ये असताना सर्वांशी बिनधास्थ पने बोलणारे, मस्करी, मजा करणारे आपण लग्न झाल्यावर बायकोसोबत असताना सख्खी मैत्रिण भेटलीकी तिच्याशी नजर मिळवताना आपली नजर नकळतच खाली जाते.
म्हणून माझ्या मते तरी मैत्रिण आणि गर्लफ्रेंड ह्यामध्ये गल्लत करू नये. मैत्रिण असेल तर तिला गर्लफ्रेंड च रूप देण्याचा प्रयत्न करू नये. नाही तर ती खरी मैत्रिण कधीच होऊ शकत नाही. कारण मैत्रिण आणि गर्लफ्रेंड ह्या दोन्ही वेगवेगळ्या कॉनसेप्ट आहेत आणि उगाचच या दोघांची गल्लत करून आयुष्यात आपण एखाद्या चांगल्या मैत्रिणीच्या मैत्री पासून मुकतो. शेवटी एकच सांगावेसे वाटते की .....
एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीतर अश्रुही पुसणारी
स्वताःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळेप्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजूत काढणारी
वाकड पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या शिखारांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यांच्याच घोळक्यात
आपल्याला सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसताना व्याकूळ होणारी
खरच! अशी एक तरी जीव भावाची
‘मैत्रीण’ हवी जी आपणास मित्र म्हणवणारी .....
थायरोईड विषयी खूप मेहनतीने अभ्यासपूर्ण केलेल्या लेखन बद्दल आपले अभिनंदन.सर्वसाधारण माणसाला ह्या विषयाची इतपत माहिती हि नक्कीच नसते.ती आपण करून दिल्या बद्दल धन्यवाद.
ReplyDeleteत्या लेखाखाली कॉमेंट करणे शक्य होत नसल्याने नाईलाजाने येथे प्रतिक्रिया देत आहे. क्षमस्व.
Deleteथायरोईड विषयी खूप मेहनतीने अभ्यासपूर्ण केलेल्या लेखन बद्दल आपले अभिनंदन.सर्वसाधारण माणसाला ह्या विषयाची इतपत माहिती हि नक्कीच नसते.ती आपण करून दिल्या बद्दल धन्यवाद.
ReplyDeleteमनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. कमेंट दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद. आपले पूर्ण नाव जाणून घेण्यास आम्हाला नक्की आवडेल. कृपया मनकल्लोळ वर आपली पूर्ण ओळख करून द्यावी...
ReplyDeleteतोडलस मित्रा
Deleteमैत्रीण व गलफ्रेंड ह्यांच्यातील फरक मस्तपणे सांगितला आहे.
निनाद मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. ब्लॉग ला भेट देऊन कमेंट दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद.....
ReplyDeletesundar
ReplyDeletedhanyavad
Deleteधन्यवाद सर मराठी लेखासाठी गूगलचं अप्रूवल मिळाल नसेल तर माझ्या आयडीवर संपर्क साधा। किवा माझी वेबसाइट ऊघडा www.kathasahity.com मराठी ब्लँग्गरला अप्रूवल मिळण्यासाठी ज्या टिप्स असेल त्या मी लवकरच ह्या वेबसाइवर टाकणार आहे.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete