Monday, July 29, 2019

लोकं प्रेम का करतात


आजच महेंद्रच्या काय वाटेल ते ब्लॉग वर लोकं लग्न का करतात? ही पोस्ट वाचली. पोस्ट वाचता-वाचता मा‍झ्या मनात देखील एक प्रश्न आल, खरच लोक प्रेम का करतात ? तसा ह्या विषयाचा माझा अनुभव इतका दांडगा नाही. तरी पण काही सुचलेल्या गोष्टी येथे सांगतो. 
प्रेम करण्याचं पहिल कारण म्हणजे पाहताच क्षणी एखाद्या च्या प्रेमात पडणे.इंग्लीश मधल love at first sight त्यातला काहीसा हा प्रकार. पण आताच्या ह्या प्रक्टिकल आणि व्यावहारिक जगात असले प्रकार फार कमी पाहायला मिळतात.पूर्वी लोक पाहता क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडायची अगदी दोन-तीन भेटीन मध्ये सर्व काही साता जन्माची स्वप्न बघून घेत आणि आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय इतक्या सहज घायची,असो तेव्हा लोकांच्या गरजा ही फार कमी आणि माफक होत्या त्यामुळे कि कदाचित शक्य असेल. पण आता ह्या गोष्टी इतक्या सोप्या राहिल्या नाहीत. हल्ली मुला आणि मुलींची दोघांच्या हि अपेक्षा आणि गरजा वाढलेल्या आहेत म्हणून कि भावनाणं बाजूला सारून त्यांना नायीलाजाने का होईना त्यांना व्यावहारिक आणि प्रक्टीकल निर्णय घ्यावेच लागतात.
कधी-कधी प्रेम फक्त एखाद्या बद्दल वाटणार आकर्षणं देखील असू शकत.नुकतेचन तारुण्याचा उंबरठा ओलांडलेल्या मुला-मुलींन मध्ये असले प्रकार आढळून येतात. किंबहुना ते प्रेम नसतच पण ते वयच तसं असतं कि तेव्हा कशाचीच अक्कल नसते आपल्याच धुंदीतच आपण जगत असतो.
चंदेरी-दुनिया म्हणजेच चित्रपट – गाणी ह्याचा प्रभाव पूर्वी देखील होता आणि आत्ता तर फारच प्रखरशाने जाणवतोय मग ती आर. डी. बर्मन ऊर्फ 'पंचमदा' ह्याचं “ भिगी-भिग रातोमे” किंवा आताचे अखिल सचदेव आणि तुलसी कुमार ह्याचं कबीर-सिंघ मधील “तेरा बन जाऊंगा” हे संगीत असो, आपल्याला थोडा का होयीना प्रेमाची जाणीव करून देते आणि त्या गुलाबी आणि चंदेरी-दुनियेत घेहून जाते. ही तर सर्व त्या कलाकाराची जादू असते कि त्या चित्रपटात किंवा संगीतात त्याने आपला जीव ओतलेला असतो पण ते विसरून आपण आपल्याच भावना आणि जीवनातील प्रसंग त्या चित्रपटाशी किंवा संगीताशी जुळविण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही आपण नकळतच त्या कलाकाराला त्याच्या कलेची दिलेली दाद असते.
केव्हा-केव्हा इतरांच बघून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्याश्या वाटतात प्रेम देखील त्याला अपवाद नाही. पण आता पर्यंतचा इतिहास असच सांगत आलेला आहे कि इतरांचे बघून घेतलेले निर्णय नेहमीच चुकतात. इंग्लीश मध्ये एक सुंदर वाक्य आहे "LIFE IS THE MOST DIFFICULT EXAM, MANY PEOPLE FAIL BECAUSE THEY TRY TO COPY OTHERS, NOT REALIZING THAT EVERYONE HAS A DIFFERENT QUESTION PAPER." म्हणून थोडं जपूनच.
सोशल मिडिया, ह्याचा प्रभाव अलीकडे फारच वाढला आहे मग Facebook, Whatsup, Instagram किंवा Twitter. असो सध्या लोकांना रिलेशनशिप मध्ये पडल्यावर पहिले स्टेट्‍स अपडेट करण्याची फार घाई असते यात वावगं अस काहीच नाही फक्त स्टेट्‍स अपडेट करण्यापूर्वी एकदा विचार करावा कि हे खरच गरजेच आहे का ? मा‍झ्या मते तरी सोशल मिडिया म्हणजेच Facebook किंवा Whatsup इत्यादि प्रेम मिळवण्यासाठी माध्यम बनू शकतात म्हणजे पूर्वी नाही का ' पत्र ' किंवा ' तार ' वगैरे लिहायचे अगदी तस. पण Facebook किंवा Whatsup वर एकःदायाचा प्रोफाईल बघून प्रेम करण थोडं कठीणच वाटत, असो तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
वय, मुलींच २१-२२ आणि मुलांच २५-२६ ओलांडल्या वर लग्न झालच पाहिजे असा आपल्याच समाजाने घातलेला पायंडा आहे. त्यामुळे मुलां आणि मुलींन मध्ये खरच वय निघून चालय कि काय ह्याची भीती सतावत असते. पण आता त्याचे प्रमाण काहीसे कमी होत चालेले आहे कारण सध्याच्या मुली आता उच्चशिक्षित आणि आपल्या करिअर कडे जास्त लक्ष देत आहेत, म्हणून असाव. असो पण हा बदल स्वागथार्यच आहे आपल्या समाजासाठी.
मुंबई तर खर गर्दीचे शहर म्हणून ओळखलं जात पण खरच तस आहे का ? ह्या प्रचंड गर्दी मध्ये माणूस एकटा पडत चाललेला आहे त्याची बरीच कारण असू शकतात जॉब असेल, महागाई किंवा आत्ताची बदललेली लाईफ स्टाईल. पण एक मानवी स्वभावच तो, एका ठराविक वयानंतर त्याला आपल्या लाईफ पार्टनर ची गरज भासू लागते आणि त्या पद्धतीने त्याचे एक चित्र तो आपल्या मनांमध्ये तयार करतो आणि स्वप्न बघू लागतो.
कधी-कधी स्वभाव, आवडी-निवडी, छंद एकसारखे असले के आपसूकच दोघां मध्ये प्रेम घडून येत जसे कि एखादा गायक- गायिका किंवा हिरो- हिरोइन असो किंवा दोघ एकाच क्षेत्रामध्ये काम करत असो. पण मा‍झ्या मते तरी ह्या प्रकारात दोघंही स्वत:च्या प्रोफेशन मुळे एकमेकांना वेळ देऊ शकता नाहीत  पण दु:खं तर नक्कीच समजून घेऊ शकतात जे बाकी प्रकरणांमध्ये कमी पाहायला मिळते. 
स्वप्न, प्रत्येक जन आपल्या स्वपनात ' राजकुमार ' किंवा ' राजकुमारी ' बघत असतो आणि हीच स्वप्न बघूनच काही जन प्रेमात पडतात मंग ती जुनी परी-कथेतील सीनड्रेला (CINDERELLA) असो कि आताचा कबीर-सिंघ.
पैसा, कधी-कधी प्रेम हे पैसा किंवा संपत्ती बघून सुद्धा केल जात त्यात गैर अस काही च नाही कारण प्रमाणे मन भरू शकत पण पोट नाही. सध्याच्या जगात तग धरून उभं राहायचं असेल तर आर्थिक दृष्ट्‍या सक्षम होणं सुद्धा तितकेच गरजेच आहे. पण त्यासाठी प्रेम करून एखाद्याच्या भावनांशी खेळणं कितपत योग्य आहे हे खरच तपासून बघने गरजेचे आहे. आर्थिक दृष्ट्‍या सक्षम होण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो उदाहरणार्थ मुलींना चूल आणि मुलं इतपत योग्य न समजता ती देखील आपल्या कर्तृत्वाने आपली आर्थिक स्थिती बदलू शकते हे प्रत्येक मुलाने लक्षात घेतले पाहिजे हे सांगायचे कारण म्हणजे, आजही देखील मुलं लग्ना नंतर मुलींना नोकरी सोडण्यासाठी भाग पाडतात.
शारीरिक सुख, (sexula need), मा‍झ्या मते तरी खरंतर हे प्रेम करण्याच कारण असूच शकत नाही. फक्त आपली शारीरिक गरज भागण्यासाठी एखाद्या बरोबर प्रेम करण आणि गरज संपली असता त्या व्यक्तीला सोडून देणे म्हणजे त्याच्या भावनांचा केलेला तो बलात्कार च होय. असो ह्या विषयावर बरच काही लिहिता येईल पण आता नको. मुळात मा‍झ्या मते हा पर्यायच असू शकत नाही प्रेम करण्यासाठी.
सरतेशेवटी एवढंच सांगतो कि प्रेम करण्याची अनेक कारणे असू शकतात ती व्यक्ती परत्वे बदलू शकतात. फक्त जर प्रेम केलं असेल तर ते का केल ? आणि केल नसेल तर का कराव ? थोडा विचार करून बघा आणि जर काही नवीन भन्नाट सुचलं तर येथे कमेंट करायला विसरू नका.

2 comments:

  1. सही खूपच सही आहे तुमची

    ReplyDelete
  2. मनकल्लोळ वर कमेंट दिल्या बद्दल धन्यवाद.आपली ओळख जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल.

    ReplyDelete

मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा